Techno Savi work

26/04/2018

आभाळाची आम्ही लेकरे


आभाळाची आम्ही लेकरे,
आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही
श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकऱ्यांची अमुची वस्ती
नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळूनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही
माणुसकीचे अभंग नाते
आम्हीच अमुचे भाग्यविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही
कोटी कोटी हे बळकट बाहू
जगन्नाथ-रथ ओढून नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही

No comments: