Techno Savi work

03/10/2018

स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छ भारत मोहिम भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी हा एक  प्रकल्प आहे. प्रधान मंत्रींनीं २ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. राष्ट्रीय स्तरावर या अभियानाची दखल घेतली जात आहे. स्वच्छ भारत अभियान या मोहिमेचा एक मुख्य ध्येय आहे भारतातील सर्व शहरे आणि गावे “ओपन डेफकेशन फ्री” म्हणजेच हागणदारी मुक्त करणे. यासोबतच, स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश भारतातील रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे हा आहे. या मोहिमेविषयी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे सर्व शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छता आणि शौचालयांची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करणे ही आहे. या स्वच्छ भारत अभियान भारत अभियानातून भारतीयांना स्वच्छतेचे महत्व आणि फायदे यांची जाणीव करून देणे हे सुद्धा आहे.

या आंर्तगत आमच्या शाळेचा छोटा सा उपक्रम . दिनांक ०२/१०/२०१८ स्थळ  - कुलाबा शाळा समुह.

No comments: